Last Updated: Monday, May 27, 2013, 15:31
www.24taas.com, झी मीडिया,लंडनस्टील सम्राट लक्ष्मी मित्तल यांनी लंडनमधला आपला भव्य राजवाडा पॅलेस ग्रीन विक्रीला काढला आहे. २००८ साली त्यांनी आपला मुलगा आदित्य याच्यासाठी तब्बल ११ कोटी पौडांना हा महाल खरेदी केला होता.
१२ बेडरूम असलेल्या या महालाचं क्षेत्रफळ पावणे पंधरा हजार स्क्वेअर फूट आहे. लक्ष्मी मित्तल किंवा आदित्य यांच्यापैकी कोणीच या राजवाड्यात राहिलेलं नाही. मित्तल यांचं घर इथून जवळच असलेल्या केन्सिंग्टन पॅलेस गार्डन या अतिउच्चभ्रू वस्तीत आहे.
लंडनच्या संडे टाइम्सनं वर्तवलेल्या अंदाजानुसार जागतिक अर्थव्यवस्थेमुळे यंदा नफा कमी मिळण्याचा अंदाज असल्यानं त्यांना हा निर्णय घ्यावा लागलाय. त्यामुळे आजवरची लंडनमधली सर्वात मोठी गृहखरेदी असा लौकीक मिळवलेला हा राजवाडा आता पुन्हा चर्चेत आलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 27, 2013, 15:27