Last Updated: Friday, August 31, 2012, 19:02
www.24taas.com, मनिलाफिलिपाईन्स बेटांना आज भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी मोजण्यात आल्याचे अमेरिकेच्या भूगर्भ विभागाने दिली आहे.
जमीनीपासून ३३ किलोमीटर खाली हा भूकंपाचा धक्का बसला. यामुळे इंडोनेशिया फिलिपाईन्स, तैवान, जपान, ग्वाम आणि इतर भागांना त्सुनामीचा इशारा देण्यात आल्याचे त्सुनामी इशारा केंद्राने सांगितले आहे.
अशा प्रकारच्या भूकंपाने त्सुनामीचा धोका निर्माण होऊ शकतो. काही मिनिटातच त्सुनामी येण्याची शक्यता आहे.
First Published: Friday, August 31, 2012, 18:54