फिलिपिन्समधील चक्रीवादळ तडाख्यात १०० जणांचा बळी, strongest storms on record slammed into the central Philippines o

फिलिपिन्समधील चक्रीवादळ तडाख्यात १०० जणांचा बळी

फिलिपिन्समधील चक्रीवादळ तडाख्यात १०० जणांचा बळी
www.24taas.com, वृत्तसंस्था, मनिला

हैयान हे सर्वांत धोकादायक चक्रीवादळ फिलिपिन्सच्या सागरतटास धडकले. या वादळात १०० हून अधिक लोकांचा बळी गेलाय. या चक्रीवादळाचा लेटे बेटावरील टॅक्लाबन या शहराला सर्वाधिक फटका बसला आहे.

मध्य फिलिपिन्सला शुक्रवारी बसलेल्या चक्रीवादळ तडाख्यात अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच या भागामधील वीजप्रवाहही खंडीत झाला आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, नागरिकांना रस्त्यावर सहारा घ्यावा लागत आहे. या वादळामुळे फिलिपीन्समध्ये ताशी २३५ ते २७५ किमी वेगाने वारे वाहत होते. पूर्व फिलिपिन्समधील समार प्रांतामधील गुईआन शहरास हे वादळ धडकले.

या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर सागरी प्रवास वा हवाई उड्डाणेही रद्द करण्यात आलीत. यामुळे दोन हजारांपेक्षा जास्त प्रवासी अडकून पडलेत. वाऱ्यांच्या वेगामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे. पूर्व फीलिपीन्समधील समार प्रांतामधील गुईआन शहरास वादळाचा तडाखा बसला आहे. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर सुमारे लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे नुकसान टळले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, November 9, 2013, 17:07


comments powered by Disqus