Last Updated: Monday, July 22, 2013, 15:46
www.24taas.com, झी मीडिया, फिलाडेल्फियाफिलाडेल्फिया येथील एका आईने अत्यंत आश्चर्यकारक जाहिरात दिली आहे. ही माऊली आपल्या मुलाची अब्रु लुटू शकणाऱ्या मुलीच्य़ा शोधात आहे. तिला असं वाटत आहे की आपल्या मुलाचा अद्याप कुठल्याही मुलीशी शरीरसंबंध आलेला नाही. त्यामुळे त्याला लहान मुलाचा पुरूष बनवण्यासाठी त्याची अब्रू लुटणारी मुलगी हवी आहे. या आईने अशी मुलगी मिळाल्यास तिला पुरस्कार म्हणून कार देण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे.
या आईने आपल्या जाहिरातीत असं लिहिलं आहे, की तिला अशी मुलगी हवी आहे, जी सुंदर असेल. तिचं वय १९ वर्षं असावे. तिने आपल्या मुलाला डेट करावं. याशिवाय ती मुलगी त्याला हायस्कुलमधल्या मुलापासून कॉलेज स्टड बनवेल. ही जाहिरात ‘शुगर बेबी फॉर माय सन’ या नावाने प्रकाशित झाली आहे.
प्रत्यक्षात तिचा मुलगा दिसायला वाईट नाही. मात्र या मातेला आपल्या मुलावर विश्वास नाही. या मुलाचा कौमार्यभंग होणं आवश्यक असल्याचं तिला वाटत असल्याने तिने अशी जाहिरात दिली आहे. या मुलाची अद्याप एकही गर्लफ्रेंड नसल्याची आईला खात्री आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, July 22, 2013, 15:46