Last Updated: Saturday, August 3, 2013, 16:42
www.24taas.com, झी मीडिया, जलालाबादअफगाणिस्तानातल्या जलालाबाद शहरात भारतीय उच्चायुक्तालयाजवळ आत्मघातकी बाँम्ब हल्ला झाला. यात ८ मुलं ठार तर २१ जण जखमी झाले आहेत.
उच्चायुक्तालयातले सर्व भारतीय सुखरूप आहेत. त्यांना कोणतीही हानी पोहोचलेली नाही असं परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलंय. जलालाबाद हे शहर पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
मात्र याआधी भारतीय उच्चायुक्तालयावर झालेले हल्ले हक्कानी गट आणि तालिबानने घडवले आहेत. त्यामुळे यावेळीही संशयाची सुई त्यांच्यावरच आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 3, 2013, 16:31