सुनीता खाणार अंतराळात आईस्क्रिम!, sunita will have ice cream in space

सुनीता अंतराळात खाणार आईस्क्रिम!

सुनीता अंतराळात खाणार आईस्क्रिम!
www.24taas.com, वॉशिंग्टन
सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात असणाऱ्या अंतराळवीरांना लवकरच अंतराळातही आईस्क्रिमचा आनंद घेता येणार आहे. रविवारी मानवविरहीत मालवाहक यान अंतराळात सोडण्यात आलंय. या सामानामध्ये नासानं अंतराळवीरांसाठी एका छोट्या फ्रिजरमध्ये आईस्क्रिमही पाठवलंय.

अंतराळात वेगवेगळे रेकॉर्ड निर्माण करणारी सुनीता विल्यम आणि तिचे सहकारी आता आणखी एक रेकॉर्ड तयार करणार आहेत. तो म्हणजे अवकाशात आईस्क्रिम खाण्याचा... ‘स्पेसएक्स’ या खाजगी स्पेसफ्लाईट कंपनीनं अंतराळात मालाची वाहतूक करता यावी यासाठी ‘द ड्रॅगन कॅप्सूल’ नावाचं एक यान बनवलंय. अंतराळात जाण्यासाठी या यानानं रविवारी फ्लोरिडा स्थित केप कानावेराल विमानतळावरून उड्डाण केलंय.
या विमानात तब्बल ४५४ किलो सामान अंतराळात पाठवण्यात आलंय. यामध्ये प्राथमिक हार्डवेअर साहित्य, मशिनचे काही सुटे भाग, कपडे, खाण्याचे पदार्थ आणि एक फ्रिजरही पाठवण्यात आलंय. या फ्रिजरमध्ये आईस्क्रिम ठेवण्यात आलंय.

First Published: Tuesday, October 9, 2012, 12:38


comments powered by Disqus