फिलिपिन्सला चक्रीवादळाचा तडाखा, Super Typhoon Haiyan gaining strength, heading towards Philippines

फिलिपिन्सवर घोंगावतेय चक्रीवादळ, लाखोंचे स्थलांतर

फिलिपिन्सवर घोंगावतेय चक्रीवादळ, लाखोंचे स्थलांतर
www.24taas.com, वृत्तसंस्था, मनिला

हैयान हे सर्वांत धोकादायक चक्रीवादळ फिलिपिन्सच्या सागरतटास धडकले आहे. त्यामुळे फिलिपिन्समधील लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

फिलिपिन्समधील अनेक भागांमधील वीजप्रवाहही बंद करण्यात आला आहे. या वादळामुळे फीलिपीन्समध्ये ताशी २३५ ते २७५ किमी वेगाने वारे वाहत आहेत. पूर्व फिलिपिन्समधील समार प्रांतामधील गुईआन शहरास हे वादळ धडकले आहे.

या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर सागरी प्रवास वा हवाई उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. यामुळे दोन हजारांपेक्षा जास्त प्रवासी अडकून पडले आहेत. वाऱ्यांच्या वेगामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर सुमारे सव्वा लाख नागरिकांना हलविण्यात आले आहे. तर अनेक शाळा, सरकारी कार्यालये तसेच इतर इमारतीही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 8, 2013, 23:02


comments powered by Disqus