Last Updated: Monday, September 2, 2013, 18:38
www.24taas.com, झी मीडिया, आयोवाअमेरिकेच्या राजकारणात मराठी झेंडा फडकताना दिसत आहे. मूळच्या नागपूरच्या असलेल्या स्वाती दांडेकर यांनी अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षामध्ये आपली उमेदवारी जाहीर केली आहे..
त्या २००३ ते ०९ या काळात त्यांनी मरिऑन विभागाचं आयोवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्जचं प्रतिनिधित्व केलं. २००९ ते ११ दरम्यान दांडेकर आयोवाच्या सिनेट सदस्य होत्या. या काळात त्यांनी रोजगार निर्मिती, कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जॉब स्किल्स यावर चांगलं काम केलंय. उमेदवारी जाहीर करताना गेल्या एक महिन्यापासून आपण या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचं दांडेकर यांनी सांगितलं.
आपण सातत्यानं जनतेशी संपर्क ठेवून आहोत. त्या आधारे पुढल्या जूनमध्ये पक्षाचं नॉमिनेशन आणि नोव्हेंबर २०१४मध्ये काँग्रेसची सीट जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, September 2, 2013, 18:38