शांततेच्या नोबेलसाठी व्लादिमिर पुतिन यांचं नामांकनSyria impact: Vladimir Putin nominated for Nobel Peace Prize

शांततेच्या नोबेलसाठी व्लादिमिर पुतिन यांचं नामांकन

शांततेच्या नोबेलसाठी व्लादिमिर पुतिन यांचं नामांकन
www.24taas.com , वृत्तसंस्था, मॉस्को

सीरियावरील हल्ला ज्यांनी आपल्या मध्यस्थीनं रोखला, ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नावाचं यंदाच्या शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन केलंय.

रशियातील ‘इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ स्पिरिचुअल युनिटी अँड कोऑपरेशन’ या संस्थेनं पुतीन यांना शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सीरियातील गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या यादवीच्या पार्श्व भूमीवर राजकीय आणि धोरणात्मक उत्तर शोधण्यासाठी पुतिन यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्यामुळं नोबेल पारितोषिकासाठी ते योग्य आहेत, असं संस्थेचे उपाध्यक्ष बेस्लन कोबाजिआ यांनी सांगितलं. संस्थेकडून तशी विनंती करणारं पत्र १६ सप्टेंबर ला नोबेल पारितोषिक समितीकडं पाठविण्यात आलं. `ऑल रशियन एज्युकेशन फंड` कडून पुतिन यांचं नाव या पूर्वीच सूचविण्यात आलं होतं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 08:10


comments powered by Disqus