धास्तावलेल्या सीरियाची संयुक्त राष्ट्राकडे मदतीची याचना, syria request UN to interfere

धास्तावलेल्या सीरियाची संयुक्त राष्ट्राकडे मदतीची याचना

धास्तावलेल्या सीरियाची संयुक्त राष्ट्राकडे मदतीची याचना
www.24taas.com, झी मीडिया, संयुक्त राष्ट्र

अमेरिकेनं असद सरकारविरुद्ध सीरीयावर हल्ला करण्याचा बेत आखल्याचं आता स्पष्ट झालंय. यामुळेच धास्तावलेल्या सीरियानं संयुक्त राष्ट्राकडे या संभावित हल्ल्याला रोखण्याची विनंती केलीय.

अमेरिकेनं सैन्य कारवाई करून सीरियावर हल्ला केला तर अलकायदा तसंच या दहशतवादी संघटनेशी संबंधीत इतर तमाम संघटनांना आणखीनच खतपाणी मिळेल, असं सीरियानं म्हटलंय. सरकारी न्यूज एजन्सी ‘सना’च्या म्हणण्यानुसार संयुक्त राष्ट्रात सीरियाचे प्रतिनिधी बशर अल जाफरी यांनी एका पत्रामध्ये, सीरियाई सरकारनं संयुक्त राष्ट्र महासचिव यांना आपली जबाबदारी निभावण्याचं आवाहन करून सीरियावर होणारा हल्ला रोखण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्याची विनंती केलीय. शांतिपूर्णरित्या काही तोडगा निघू शकतो का? यावरही विचार केला जावा, असंही त्यांनी या पत्रात म्हटलंय.

दुसरीकडे, सीरियाचे परदेश उपमंत्री फैझल मुकदद यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेनं अलकायदा आणि संबंधित संघटनांना मदत करण्यासाठीच सैन्य कारवाईचा निर्णय अमेरिकेनं घेतलाय.

अमेरिका आणि सहयोगी देश सीरियामध्ये गेल्या २१ ऑगस्ट रोजी झालेल्या कथित रासायनिक हल्याच्या प्रतिक्रियेच्या स्वरुपात दमिश्कविरुद्ध सैन्य कारवाईसाठी तयारीत आहे. अमेरिकेच्या दाव्यानुसार या रासायनिक हल्ल्यात १,४२९ जण नाहक मारले गेले आहेत. सीरियानं मात्र अमेरिकेचा हा आरोप पहिल्यापासून धुडकावून लावलाय.

अमेरिका परदेशमंत्री जॉन केरी यांच्या म्हणण्यानुसार सीरियामध्ये झालेल्या कथित रासायनिक हल्लासंबंधी असद सरकारला धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर सैन्य कारवाई करणासंबंधी राष्ट्रपती ओबामा यांच्याजवळ काँग्रेसच्या परवानगीसहीत किंवा परवानगीशिवाय यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 09:54


comments powered by Disqus