Last Updated: Tuesday, February 12, 2013, 18:33
www.24taas.com, इस्लामाबादपाकिस्तानी बाजारांमध्ये ब्ल्यू फिल्म्स आणि व्हायग्रासारखी औषधं विकण्यास तालिबानने बंदी घातली आहे. कुठल्याही दुकानदाराने अश्लील सिनेमांच्या सीडीज विकू नयेत. तसंच व्हायग्रा आणि तत्सम औषधंही विकू नयेत असा आदेश पाकिस्तानी तालिबानने दिला आहे.
दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार एका सकाळी पाकिस्तानी बाजारपेठांमधील दुकानदारांनी सकाळी दुकानं उघडली, तेव्हा त्यांना दुकानात तालिबानने दिलेला इशारा वाचायला मिळाला. या इशाऱ्यात तालिबानने “लिंग उत्तेजक औषधं आणि अश्लील सिनेमांची विक्री करणं शरिया कायद्याविरुद्ध आहे.”
पाकिस्तानी कारखान्यांमध्ये आणि बाजारांमध्येमोठ्या प्रमाणावर ब्ल्यू फिल्म्स आणि व्हायग्रासारखी ओषधं खुले आम विकली जातात. तहरिक-ए-तालिबान खैबर या नावाने वाटल्या गेलेल्या पत्रकांमध्ये स्पष्टपणे धमकी लिहिली गेली होती. “हा व्यापार करणाऱ्या आणि अशा वस्तू विकत घेणाऱ्याला आपल्या पापांची शिक्षा भोगावी लागेल.” असा इशारा तालिबानने दिला आहे.
First Published: Tuesday, February 12, 2013, 17:40