पोलिओ लसीकरणाला विरोध; महिलांना घातल्या गोळ्या, taliban against Polio Vaccination Campaign, attack on ladies

पोलिओ लसीकरणाला विरोध; महिलांना घातल्या गोळ्या

पोलिओ लसीकरणाला विरोध; महिलांना घातल्या गोळ्या
www.24taas.com, कराची

पाकिस्तानचं बंदरांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराचीमध्ये मंगळवारी पोलिओ लसीकरण अभियानामध्ये सहभागी झालेल्या चार महिलांची गोळ्या मारून हत्या करण्यात आलीय.

बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार सिंध प्रांतातील एका मंत्र्यांनं ही माहिती दिलीय. काही बंदूकधारी व्यक्तींनी या चार महिलांना गोळ्या घालून ठार केलं तर या महिलांसोबत असणाऱ्या इतर दोन व्यक्तीदेखील या घटनेत जखमी झाल्यात. शहरातल्या तीन वेगवेगळ्या भागांत हे हल्ले घडलेत.

आंतरराष्ट्रीय संघटना ‘यूनिसेफ’कडून कराचीमद्ये तीन दिवसांचा पोलिओ उच्चाटनाचा कार्यक्रम सुरू आहे. या अभियानादरम्यान जवळजवळ ५२ लाख लहानग्यांना हे पोलिओचे डोस दिले जाणार आहेत. पण, या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळे सध्या या अभियानाला स्वल्पविराम मिळालाय.

पोलिओ लसीकरणाला तालिबानचा विरोध आहे आणि हे लसीकरण थांबवण्यात यावं यासाठी तालिबानकडून याअगोदरही कित्येक वेळा धमक्या मिळाल्यात. त्यामुळे या हल्ल्याची जबाबदारी आत्तापर्यंत कोणत्याही संघटनेनं स्वीकारली नसली तर हा हल्ला पाकिस्तानी तालिबाननंच घडवून आणला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

First Published: Wednesday, December 19, 2012, 08:30


comments powered by Disqus