पाकिस्तान हादरले, तालिबान हल्ल्यात २१ सैनिक ठार, Taliban attack in Pakistan

पाक हादरले, तालिबान हल्ल्यात २१ सैनिक ठार

पाक हादरले, तालिबान हल्ल्यात २१ सैनिक ठार
www.24taas.com,कराची

पाकिस्तानमध्ये तालिबान्यांनी २१ सैनिकांना ठार मारलंय. शुक्रवारी या सैनिकांचं अपहरण करण्यात आलं होतं. तर कार बॉम्बस्फोटातील दुसऱ्या घटनेत १९ जणांचा बळी गेला.

खैबर प्रांतातल्या वेगवेवेगळ्या पाच ठिकाणाहून या सैनिकांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलीय. त्यातला एक सैनिक तालिबान्यांच्या तावडीतून कसाबसा सुटला. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या सैनिकांचे मृतदेह पेशावरनजीकच्या जबाई भागात सापडले.

दुसऱ्या एका घटनेत पाकिस्तानमध्ये क्वेटा शहराच्या मतसूम भागात झालेल्या कार बॉम्बस्फोटात १९ जण ठार तर २० जण जखमी झालेत. शिया यात्रेकरूंच्या बसजववळ हा अपघात झाला.

बसमध्ये ४५प्रवासी होते. जखमींवर क्वेट्टाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

First Published: Monday, December 31, 2012, 07:39


comments powered by Disqus