Last Updated: Sunday, July 14, 2013, 10:04
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई पवित्र रमजान महिना सुरू झालाय. याच रमजान महिन्यात काय नियम पाळायचे आणि कसं वर्तन ठेवायचं याबद्दल तालिबाननं शनिवारी काही फर्मान सोडलेत.
‘रमजान महिन्यात घट्ट आणि पातळ कपडे घालू नका आणि रोजा ठेवलाच पाहिजे’ असे फर्मान तालिबान्यांनी सोडलेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षेची तरतूदही तालिबान्यांनी केलीय. रोजा पाळला नाही तर एका महिन्याच्या कैदेची शिक्षा सुनावलीय.
तालिबान समुहाच्या एका बैठकीत सर्वसंमतीनं हा निर्णय घेण्यात आलाय. महिला आणि पुरुषांनी या पवित्र महिन्यात घट्ट कपडे घालू नयेत, तसंच ट्रान्सपरन्ट कपडेही चालणार नाहीत असं या फर्मानात म्हटलंय.
दुकानांनी आणि टेलर्सकडे असे कपडे आढळले तर त्यांच्यावरही कारवाई होईल आणि त्यांना शिक्षेसोबतच ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाईल, अशी चेतावणी दिली गेलीय. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना शरिया कायद्यान्वये शिक्षा दिली जाईल, असं म्हटलं गेलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, July 14, 2013, 10:04