मोटारसायकलस्वार दहशतवाद्यांचं टार्गेट... पाक सैन्य, terrorist attack on pakistan army

मोटारसायकलस्वार दहशतवाद्यांचं टार्गेट... पाक सैन्य

मोटारसायकलस्वार दहशतवाद्यांचं टार्गेट... पाक सैन्य
www.24taas.com, इस्लामाबाद

पाकिस्तानच्या पश्चिम भागात स्थित एका सैन्य परिसरावर काही मोटारसायकलस्वार दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात चार सुरक्षाकर्मींसह १२ लोक जखमी झालेत.

प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्य म्हणण्यानुसार, या दहशतवाद्यांनी यावेळी दोन हातबॉम्ब या परिसरावर टाकले. यावेळी सैन्य परिसराच्या गेटवर तरुणांचा एक घोळका उभा होता. सैन्यात भरती होण्यासाठी हे तरुण इथं नोंदणी करण्यासाठी दाखल झाले होते.

रिसालपूरच्या जीटी रोडवर सैन्याचं हे ठिकाण आहे. हवाई दल अकॅडमी आणि इतर सैन्य प्रशिक्षण केंद्र इथं आहेत. मोटारसायकलवर आलेले हल्लेखोर हातबॉम्ब टाकल्यानंतर तातडीनं घटनास्थळावरून फरार झाले. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात चार सुरक्षाकर्मी आणि आठ नागरिक जखमी झालेत. जखमींना जवळच्याच एका हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

सुरक्षा दलानं या परिसराला घेरलंय आणि ठिकठिकाणी झाडाझडती सुरू केलीय. पोलीस उपाधिक्षक मोहम्मद रियाज खान यांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलंय. पाकिस्तान तालिबान संघटनेनं हा हल्ला केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

First Published: Tuesday, December 18, 2012, 14:56


comments powered by Disqus