Last Updated: Saturday, December 15, 2012, 22:38
www.24taas.com, इस्लामाबाद पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झालाय तर जवळजवळ २५ लोक जखमी झालेत. जखमींना तातडीनं हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.
पेशावर विमानतळावर दहशतवाद्यांनी सलग पाच रॉकेटच्या साहाय्यानं हल्ला घडवून आणलाय. प्रथमत: हाती लागलेल्या माहितीनुसार पेशावर विमानतळाच्या आत दहशतवाद्यांवर गोळीबार अजून सुरू आहे. हल्ल्यानंतर ताबडतोब सुरक्षा यंत्रणेनं पेशावर विमानतळ सील केलंय.
First Published: Saturday, December 15, 2012, 22:36