‘टेस्ट ट्यूब बेबी’चे जनक हरपले!, Test tube baby pioneer Robert Edwards dies at 87

‘टेस्ट ट्यूब बेबी’चे जनक हरपले!

‘टेस्ट ट्यूब बेबी’चे जनक हरपले!
www.24taas.com, लंडन

‘टेस्ट ट्यूब बेबी’च्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नोबल विजेते वैज्ञानिक रॉबर्ट एडवर्डस् यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालंय.

एडवर्डस यांनी ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) चा आविष्काराची निर्मिती केली होती. याच प्रक्रियेद्वारे १९७८ साली पहिली ‘टेस्ट ट्यूब बेबी’ लुईस ब्राऊन हिचा जन्म झाला होता. यासाठी एडवर्डस् यांना नोबल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे आत्तापर्यंत चाळीस लाख बालकांचा जन्म झालाय. या आविष्कारानं अनेक संतानहिन माता-पित्यांना आशेचा किरण दाखवला होता.

केम्ब्रिजमधून ही गोष्ट जाहीर करण्यात आली. ‘नोबल पुरस्कार विजेते, वैज्ञानिक आणि आयव्हीएफ प्रक्रिया निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले प्रोफेसर एडवर्डस् यांचं १० एप्रिल २०१३ रोजी दीर्घ आजारपणामुळे मृत्यू झालाय, हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे’, असं त्यांनी जाहीर करताना म्हटलंय.

एडवर्डस यांचा जन्म २७ एप्रिल १९२५ रोजी उत्तर इंग्लंडच्या यार्कशायरमध्ये झाला होता.

First Published: Thursday, April 11, 2013, 10:30


comments powered by Disqus