जॅक्सन मृत्यू : डॉक्टरला ४ वर्षांची शिक्षा - Marathi News 24taas.com

जॅक्सन मृत्यू : डॉक्टरला ४ वर्षांची शिक्षा

झी २४ तास वेब टीम, लॉस एंजेलिस
 
 
पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या मृत्यूप्रकरणी त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर कॉनरॉड मरे याला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. औषधांचा ओव्हरडोस दिल्याच्या आरोपावरुन डॉ. मरेला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सहा आठवडे चाललेल्या सुनावणीनंतर मायकल जॅक्सनवर उपचार करणाऱ्या डॉक्टर कॅनरॉड मरेला दोषी ठरवण्यात आलं होतं आणि त्यानंतर मरेला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
मायकल जॅक्सनकडे सातत्याने दुर्लक्ष करणं,  गरजेच्या वेळी त्याचे फोन न उचलणं असे अनेक गंभीर आरोप डॉक्टर मरेवर ठेवण्यात आले आहेत.
२५ जून २००९ रोजी पॉप स्टार मायकल जॅक्सनचा गूढ मृत्यू झाला होता.

First Published: Wednesday, November 30, 2011, 12:05


comments powered by Disqus