वॉशिंग्टनमध्ये शीख पगडीधारी पोलीस - Marathi News 24taas.com

वॉशिंग्टनमध्ये शीख पगडीधारी पोलीस

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये आता सगळ्यांना दाढी ठेवणारे आणि पगडी परिधान करणारे शीख पोलीस अधिकारी पाहायला मिळतील. शीख पोलिसांना आपल्या धार्मिक चिन्हांसहीत काम करण्याची परवानगी देणारं, वॉशिंग्टन हे अमेरिकेतील पहिलं शहर ठरलं आहे.
 
‘वॉशिंग्टन डीसी’चे पोलीस प्रमुख कैथी लेनियर यांनी बुधवारी युनिफॉर्मसाठी नवी पॉलिसी लागू केली. शीख अमेरिकन लीगल डिफेंस अॅण्ड एज्युकेशन फंडच्या (SALDEF) सहयोगानं  ड्रेसबद्दलच्या या नवीन पॉलिसीचा निर्णय घेण्यात आला. युनिफॉर्मच्याच रंगाची पगडीवर आपापल्या विभागाचा बॅच लावून आपलं काम करताना पोलीस आता दिसतील. याचबरोबर त्यांना दाढी ठेवण्याचीही परवानगी दिली गेलीय. चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी हा एक प्रॅक्टिकल मार्ग आम्ही स्विकारलाय, नोकरीसाठी आता योग्यतेचा निकष अग्रेसर राहील, असं कैथी यांनी म्हटलंय.
 
पोलीस प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका शीख प्रशिक्षणार्थीनं रिजर्व्ह अधिकारी बनण्याऐवजी पोलीसमध्ये भर्ती होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानं प्रभावित होऊन SALDEFनं हा निर्णय घेतलाय. वॉशिंग्टनमध्ये सध्या ३८००० शीख पोलीस आहेत.

First Published: Thursday, May 17, 2012, 15:58


comments powered by Disqus