भारत-पाक बैठक; सईद, दाऊद यांच्यावर चर्चा - Marathi News 24taas.com

भारत-पाक बैठक; सईद, दाऊद यांच्यावर चर्चा

www.24taas.com, इस्लामाबाद
 
भारत आणि पाकिस्तानमधील प्रमुख अधिकाऱ्यांची आज एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत पहिल्यांदाच आयबी आणि एनआयएसांरख्या चौकशी संस्था यात भाग घेणार आहेत. या बैठकीत सईद आणि दाऊद यांसारख्या गुन्हेगारांना भारताकड सोपवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
 
या बैठकीत पाकप्रणित आतंकवादावर चर्चा करण्यासाठी केंद्रिय गृह सचिव आर के सिंग आयबीच्या मुख्य अधिकाऱ्यांसहित इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. दोन्ही देशांचे गृह सचिव आतंकवादाशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार आहेत तसंच नव्या व्हिसा करारावर हस्ताक्षरही करणार आहेत. या मुळे दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना मिळणार आहे.  ही बैठक दोन दिवस चालणार आहे.
 
होणाऱ्या चर्चेत आतंकवादाबरोबरच अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिमसारखे मोस्ट वाँटेड गुन्हेगार, नकली भारतीय नोटा आणि पाकिस्तानातील कैदेमध्ये असणारे भारतीय नागरीक इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे.

First Published: Thursday, May 24, 2012, 13:27


comments powered by Disqus