व्हाईट हाऊसमध्ये ख्रिसमस ट्री - Marathi News 24taas.com

व्हाईट हाऊसमध्ये ख्रिसमस ट्री


एजन्सी
 
व्हाईट हाऊसमध्ये ऍन्युअल ख्रिसमस ट्री सेरेमनी फंक्शन पार पडले. अमेरिकमध्ये दरवर्षी पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये नॅशनल ख्रिसमस ट्री चं उद्घाटन होतं. आणि त्यानंतर ख्रिसमसची धूम अमेरिकेत साजरी केली जाते. त्यानुसार राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी या ख्रिसमस ट्रीचं उद्घाटन केलं. त्यांनी संपूर्ण राष्ट्राला ख्रिसमस हॉलिडेसाठी शुभेच्छाही दिल्या.
 
त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये मिलिटरी बँन्ड आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते....बराक ओबामांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन एन्जॉयही केलं....आणि काही गाण्यांचे बोलही गुणगुणले....या कार्यक्रमाला ओबामांच्या पत्नी मिशेल ओबामा, आणि साशा आणि मालिआ या मुलीही उपस्थित होत्या..

First Published: Saturday, December 3, 2011, 17:27


comments powered by Disqus