Last Updated: Tuesday, May 29, 2012, 14:52
www.24taas.com, रोम 
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला या दिवसात आपला हनिमून साजरा करीत आहेत. एका पर्यटकाने या दोघांचा रोममधील फोटो टि्वटरवर प्रसिद्ध केला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार पोलंडच्या एका पर्यटकांने व्हॅटिकनच्या सिस्टाईन चॅपलमध्ये या नवविवाहित दांम्पत्याचा फोटो काढला. आणि त्यानंतर लगेचच टि्वटरवर हा फोटो टाकला.
मार्क आणि त्यांची पत्नी हे दोघंही रविवारी पीरलुईगी रेस्तराँमध्ये देखील दिसले होते. रेस्तराँच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, दोघांनी रोममधील खास अशा भोजनाचा आस्वाद घेतला. त्यामुळे हे नवदांम्पत्य चांगलचं मजेत आहे.
First Published: Tuesday, May 29, 2012, 14:52