अनुज बिडवेच्या हत्येची आरोपीनं दिली कबुली - Marathi News 24taas.com

अनुज बिडवेच्या हत्येची आरोपीनं दिली कबुली

www.24taas.com, लंडन
 
अनुज बिडवेच्या हत्येची आरोपीनं कबुली दिली आहे. मूळचा पुण्याचा रहिवासी असलेल्या अनुजची २६ डिसेंबरला लंडनमधल्या सॅलफोर्ड इथं हत्या झाली होती.
 
या प्रकरणी पोलिसांची अटकेत असलेल्या किअरन स्टॅप्लेटन यानं हत्येची कबुली दिलीय. मॅचेस्टर कोर्टासमोर आरोपीनं हत्यचेची कबुली दिली. यावेळी अनुजचे कुटुंबिय कोर्टात उपस्थित होते. अनुज बिडवे मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होता. तो आणि त्याचे नऊ भारतीय मित्र सुट्टी साजरी करण्यासाठी ग्रेटर मँचेस्टरला आले होते.
 
हॉटेलमधून सिटी सेंटरकडे जात असताना किअरन स्टॅप्लेटन यानं अनुजबरोबर बोलायला सुरूवात केली. त्यानंतर काही वेळातच अनुजवर गोळीबार करून तो फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. हा हल्ला वंशभेदातून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. मात्र त्याविषयीचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

First Published: Friday, June 1, 2012, 20:55


comments powered by Disqus