इ़जिप्तच्या माजी राष्ट्रपतींना जन्मठेप - Marathi News 24taas.com

इ़जिप्तच्या माजी राष्ट्रपतींना जन्मठेप


www.24taas.com, कैरो 
 
इ़जिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा घोषित करण्यात आल्यानंतर इजिप्तमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
 
सत्तेचाळीस वर्षे हुकूमशहा राहिलेले इजिप्तचे होस्नी मुबारक यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्यात आज शनिवारी सुनावणी झाली. मुबारक आणि त्यांच्या मुलाचा काय फैसला होतो, याकडे लक्ष लागले होते. जगातील सर्वात मोठय़ा खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागल्यामुळे इजिप्तच्या टीव्हीने परदेशी मीडियाला त्याच्या कव्हरेजसाठी आमंत्रण दिले आहे.
 
हबीब यांच्यासह माजी गृहमंत्री हबीब अल-अदली व इतर सहा सहकारी न्यायालयात हजर होते. होस्नी मुबारक यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आरोप असलेल्यांमध्ये उद्योगपती हुसेन सालेम यांचाही समावेश आहे. जानेवारीत इजिप्तमधील क्रांतीच्या काळात हत्याकांड, सरकारी निधीचा गैरवापर असे अनेक आरोप मुबारक यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर आहेत.
 
सत्तेचाळीस वर्षे सत्ता गाजवणारा हा हुकूमशहा स्ट्रेचर पडूनच आहे. मुबारक यांनी आतापर्यंत आपल्यावरील कोणत्याही आरोपाची कबुली दिलेली नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

First Published: Saturday, June 2, 2012, 14:48


comments powered by Disqus