ओबामांचं होतं स्वप्न, सर्व जगाने व्हावं नग्न! - Marathi News 24taas.com

ओबामांचं होतं स्वप्न, सर्व जगाने व्हावं नग्न!

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
अपरात्री दारू पिऊन एक तरूण मित्राबरोबर झिंगत चालला होता. त्यावेळी रस्त्यात दिसलेल्या सुंदर तरुणीला त्याने अडवलं. तिच्याशी फ्लर्टिंग करू लागला आणि तिला म्हणाला, “लोकांनी जर कपडेच घातले नसते, तर हे जग किती सुंदर दिसलं असतं!” हा प्रसंग वाचून तुम्हाला वाटेल, हा तरुण कुणीतरी मवाली असणार. पण तो तरूण होता चक्क बराक ओबामा...
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं १९ जून रोजी 'बराक ओबामा : द स्टोरी' हे चरित्र प्रकाशित होत आहे. वरील किस्सा याच पुस्तकातील आहे. सुंदर जगासाठी सर्वांनाच विवस्त्र करण्याची ओबामा यांच्या कल्पनेने सगळीकडे पुस्तक प्रकाशनापूर्वीच खळबळ माजवली आहे. हा किस्सा ओबामा यांच्या कॉलेजच्या दिवसांतला होता. कॉलेजमध्ये या प्रकारचे बरेच प्रसंग घडल्याचं पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. याशिवाय लोकांची बनवाबनवी करणं, झोकात सिगरेटचे झुरके घेणं आणि मवालीगिरी करणं यांचे नानाविध किस्से पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.
 
जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसुद्धा असे वागत असतील, यावर कुणाचाच विश्वास बसणं शक्य नव्हतं. त्यामुळेच, ओबामा यांचं जगासमोर न आलेलं व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी ओबामांचं चरित्र विकत घेण्यासाठी प्रकाशनापूर्वीच झुंबड उडाली आहे.

First Published: Monday, June 4, 2012, 14:14


comments powered by Disqus