भारताला चीनपासून धोका - Marathi News 24taas.com

भारताला चीनपासून धोका

www.24taas.com, इटानगर
 
अरुणाचल प्रदेशमध्ये अजुन बरंच काम करायचं बाकी असून शेवटच्या श्वासापर्यंत काम करत रहाणार असल्याची प्रतिक्रिया अरुणाचल प्रदेशमधील सामाजिक कार्यकर्ते नाबाम अतुम ह्यांनी दिली आहे.
 
भविष्यात चीनच्या हालचालीपासून अरुणाचल प्रदेशला धोका असून केंद्र सरकारने वेळीच पावलं उचलण्याची गरज अतुम ह्यांनी व्यक्त केली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेतली होती.
 
" माय होम इंडिया "  संस्थेतर्फे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
 
 
 
 

First Published: Tuesday, June 5, 2012, 11:10


comments powered by Disqus