‘क्युरिओसिटी’ लवकरच मंगळावर - Marathi News 24taas.com

‘क्युरिओसिटी’ लवकरच मंगळावर

www.24taas.com, वॉशिंग्टन 
 
मंगळ ग्रहावरची माहिती शोधून काढण्यासाठी ‘नासा’ पुन्हा एकदा सज्ज झालीय... ऑगस्टमध्ये मंगळावर पाठवलेलं ‘क्युरिओसिटी’ नावाचं रोवर लवकरच प्रत्यक्षात मंगळ ग्रहावर दाखल होणार आहे. अशी माहिती आंतराळ संस्थेनं दिलीय.
 
मंगळ ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच जीवसृष्टी कधी होती का? याबद्दल माहिती मिळवण्यासाठी या ‘मार्स रोवर’ला तिथं धाडण्यात आलंय. पर्वतांपासून ४ मैल दूर हा रोवर उतरणार आहे. एका कारच्या आकाराच्या या रोवरनं नोव्हेंबर २०११ मध्ये फ्लोरिडाहून उड्डाण केलं होतं. येत्या ६ ऑगस्टला तो मंगळावर उतरू शकेल.
 
‘तिथे उतरल्यानंतर जेवढं अंतर असेल तेवढं अंतर निम्म्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. यामुळे पर्वतांपर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहचू शकू. त्यामुळे जवळजवळ चार महिन्यांचा वेळ वाचू शकेल’, अशी माहिती नासामध्ये मंगळ ग्रहावर अभ्यास करणारे प्रबंधक पीट थेसिंगर यांनी दिलीय.
 
.
 

First Published: Wednesday, June 13, 2012, 14:15


comments powered by Disqus