चीनच्या आठ गुप्तहेरांना अटक - Marathi News 24taas.com

चीनच्या आठ गुप्तहेरांना अटक

www.24taas.com, मंडी
 
हिमाचल प्रदेशातल्या मंडीमधून चीनच्या आठ गुप्तहेरांना अटक करण्यात आलीय. गुप्तचर यंत्रणा आणि हिमाचल प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केलीय.
 
हिमाचल प्रदेशात मंडीतून आठ तैवानी पासपोर्टधारक तरुणांना अटक केल्यानंतर, हे चीनचे गुप्तहेर आहेत का, हा प्रश्न दिल्लीत चर्चेचा ठरतोय.. या प्रश्नाचे उत्तर आता या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या सिमकार्ड्स आणि इंटरनॅशनल एटीम कार्डमध्ये शोधण्याचा प्रयत्न सुरु झालाय. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांकडून 30 लाख रुपयांसह, चार तिजो-या, नेपाळी रुपये, अमेरिकी डॉलर यासह अनेक देशांची चलनं जप्त करण्यात आलीयेत. मंडीत गुप्तचर यंत्रणासह हिमाचल प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत, एका मोठ्या सुरक्षित घरातून त्यांना अटक करण्यात आलीय.
 
मात्र अटक करण्यात आलेले परदेशी नागरिक चिनी गुप्तहेर आहेत का, याबाबत काहीही बोलण्यास पोलीस तयार नाहीत.. हे आरोपी व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरही कोणत्याही सूचनेशिवाय देशात राहत असल्याचं पोलिसांनी सांगीतलय. या सर्व आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र हजारो रुपये आणि डॉलर बाळगणारे हे आरोपी, सुतारकाम आणि इलेक्ट्रिशअन्सची कामे का करत होते, या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडे नाही..
 
सुरक्षा यंत्रणांपासून वाचण्यासाठी हे आरोपी अशी कामे करत होते का, हा खरा प्रश्न आहे.. 20 खोल्यांच्या ज्या घरांत हे आरोपी राहत होते, त्याच्या भितीं 15 फूट उंचीच्या होत्या.. या भितींवर ताराही लावण्यात आलेल्या होत्या.. आणि घरात 10 हिंस्त्र कुत्रेही... या सर्व सुरक्षेवरुन बाहेरच्या कोण्या व्यक्तिनं घरात प्रवेश करु नये, हीच इच्छा असल्याचं स्पष्ट आहे..
 
 

First Published: Wednesday, June 13, 2012, 22:11


comments powered by Disqus