अमेरिकेचे न्यायधीश असणार भारतीय... - Marathi News 24taas.com

अमेरिकेचे न्यायधीश असणार भारतीय...

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
भारतातील अनेक तरूण गलेलठ्ठ नोकरी व्यवसायासाठी अमेरिकेची कास धरतात. मात्र आता अमेरिकेत भारतीय तरूणाने आपला ठसा उमटवला आहे तो एका वेगळ्याच गोष्टीने.. हिंदुस्थानी वंशाचे श्रीकांत श्रीनिवासन यांची अमेरिकेतील केंद्रीय न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
एखाद्या हिंदुस्थानी नागरिकाची अमेरिकेत न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्रीनिवासन सध्या ओबामा प्रशासनात उप सॉलिसीटर जनरल या पदावर कार्यरत आहेत.
 
श्रीनिवासन यांची डीसी कोर्ट ऑफ अपील्स या न्यायालयात नियुक्ती झाली असून ते अत्यंत महत्त्वाचे असे न्यायालय मानले जाते. त्यामुळे भारतीय व्यक्ती अमेरिकेतील खटल्यात न्यायदानाचे काम करणार आहे. ही सगळ्याच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
 
 
 
 
 

First Published: Thursday, June 14, 2012, 08:23


comments powered by Disqus