ओबामांनी केला पंतप्रधानांना फोन... - Marathi News 24taas.com

ओबामांनी केला पंतप्रधानांना फोन...

www.24taas.com, वॉशिंग्टन 
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतंच भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधलाय. व्हाईट हाऊसमधून ही माहिती देण्यात आलीय. यावेळी दोन्ही नेत्यांत स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याचं समजतंय.
 
दोन्ही नेत्यांनी यावेळी ‘युरोझोन’मुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा कसा काढला जाऊ शकतो यावर चर्चा केली. वैश्विक अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या उद्देशानं काम करण्यावर दोघांमध्ये एकवाक्यता झाली. वैश्विक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या मुद्यावर दोन्ही नेत्यांनी लक्ष देणार असल्याचं म्हटलंय. १८ जूनपासून मॅक्सिकोच्या लॉस केबॉसमध्ये सुरू होत असलेल्या २ दिवसांच्या जी-२० संमेलन यशस्वी करण्यासाठी एकमेकांबरोबर सहकार्याची भूमिका घेतलीय. या सम्मेलनावर युरोप संकटाची छाया पडू शकते. चीन आणि भारताची हळूवार होणाऱ्या वृद्धीचा वैश्विक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
 
विशेष म्हणजे, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि बराक ओबामा यांच्या चर्चेच्या काही दिवस आधी अमेरिकेत्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची त्यांनी यावेळी भेट घेतली होती. भारतासहीत सहा देशांना तेलाच्या आयातीसंबंधी सूट देण्याचा निर्णय अमेरिकेनं सोमवारी जाहीर केला होता.
 
.
 

First Published: Friday, June 15, 2012, 14:41


comments powered by Disqus