कामुकता रोखण्यासाठी... स्कर्टवर बंदी - Marathi News 24taas.com

कामुकता रोखण्यासाठी... स्कर्टवर बंदी

www.24taas.com, लंडन 
 
ब्रिटनच्या एका शाळेनं मुलींना स्कर्ट वापरण्यावर बंदी घातलीय. तसंच घट्ट पँन्टऐवजी थोडी ढगळ पॅन्ट वापरण्याची सूचना या शाळेनं विद्यार्थिनींना केलीय.
 
नॉर्थम्पटनशायर शहरातील मॉल्टन स्कूल अँड सायन्स कॉलेजनं सप्टेंबरपासून या सूचना अंमलात आणण्याचं ठरवलंय. 'मुला-मुलींमधील वाढत्या कामुकतेला रोखण्यासाठी हे कठिण पाऊल उचलल्याचं' मुख्याध्यापक ट्रेव्हर जोन्स यांनी म्हटलंय. विद्यार्थिनींवर या सूचना बंधनकारक असतील. या सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जुने कपडे वापरायला दिले जातील किंवा त्यांना घरी पाठवलं जाईल.
 
'नाइटक्लबमध्ये घालण्यासारखे स्कर्टस् घालून विद्यार्थिनी शाळेत येतात. नियमानुसार शाळेत विद्यार्थिनींनी गुढघ्यापर्यंत किंवा त्यापेक्षा थोडे लांब स्कर्ट वापरायला हवेत. पण असं होताना दिसत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात' आल्याचं जोन्स यांनी स्पष्ट केलंय.
 
 

First Published: Saturday, June 16, 2012, 13:15


comments powered by Disqus