'युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक' - Marathi News 24taas.com

'युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक'

www.24taas.com, नवी दिल्ली
 
युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक असल्याचं मत पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी व्यक्त केले आहे. आठ दिवसांच्या विदेश दौ-यावर जाण्यापूर्वी ते पत्रकारां बरोबर बोलत होते.
 
युरोपीय देशांची आर्थिक स्थिती अशीच राहिली तर जगातल्या इतर अर्थव्यस्थांसह देशाच्या विकासावरही परिणाम होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. युरोपमधील नेते आर्थिक संकटाचा सामना करण्यास समर्थ असून ते त्यातून मार्ग काढतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
 
पंतप्रधान आठ दिवसांच्या दौ-यात प्रामुख्याने मेक्सिकोमधील जी - 20 राष्ट्रांच्या आणि त्यानंतर ब्राझीलमधील रिओ - 20 परिषदेत सहभागी होणार आहेत.

First Published: Sunday, June 17, 2012, 13:11


comments powered by Disqus