Last Updated: Tuesday, June 19, 2012, 17:04
www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना झटका दिलाय. कोर्ट अवमान खटल्यात दोषी आढळलेल्या गिलानींना अपात्र ठरवून त्यांना पद सोडण्याचे आदेश दिले आहेत.
याअगोदरही पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी यांना सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवलं होतं. ‘२६ एप्रिल रोजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी हे कोर्टाचा अवमान केल्याच्या आरोपाखाली दोषी असल्याचं सिद्ध झालंय. त्यानंतर गिलानी यांच्याकडून याबद्दल काहीही उत्तर मिळालं नाही की त्यांना आपल्यावरचा आरोप फेटाळला नाही. ज्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला’, असं कोर्टानं यावेळी स्पष्ट केलंय.
गिलानी यांच्याजागी आता नव्या पंतप्रधानांची नियुक्ती केली जावी, असंही यावेळी कोर्टानं म्हटलंय. पाकिस्तान सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर पंतप्रधान गिलानी हे दोषी असल्याचं सिद्ध झालंय. यावेळी कोर्टानं पाकचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी यावेळी संविधानिक भूमिका पार पाडावी, तसंच लवकरात लवकर नव्या पंतप्रधानांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असाही आदेश यावेळी कोर्टानं दिलाय.
First Published: Tuesday, June 19, 2012, 17:04