Last Updated: Tuesday, June 19, 2012, 17:29
www.24taas.com, बंगळुरू 
आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलीसोबत दुष्कर्म करणाऱ्या फ्रांन्सच्या वाणिज्य दूतावासातील अधिकारी पास्कल मजुरिअरला आज अटक करण्यात आली आहे. पोलिसांनीच ही माहिती दिली आहे.
गृहमंत्रालयाने कालच पोलिसांना स्पष्ट केले होते की, कोणत्याही प्रकारची सूट ही दूतावासातील अधिकाऱ्याला देता कामा नये. आणि त्याच्याविरोधी कारवाई करणं गरजेचं आहे. पोलिसांनी पास्कलची भारतीय पत्नी सुजा जोंस हिने तिच्या नवऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. आणि त्याचाच आधारावर अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी बंगळुरूमध्ये असणाऱ्या फ्रांसच्या वाणिज्य दूतावासात 'डेप्यटी हेड ऑफ चॅंसर' या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या अधिकाऱ्याकडे राजनैतिक पासपोर्ट देखील नाहीये. त्याच्या स्वत:च्या पत्नीनेच त्याच्यावर आरोप केले आहेत. त्याला कडक शिक्षा केली जावी अशी तिने मागणी केली आहे.
First Published: Tuesday, June 19, 2012, 17:29