Last Updated: Thursday, June 21, 2012, 14:37
www.24taas.com, लाहोर पाकिस्तान कोर्टानं एका व्यक्तीला चक्क 112 वर्ष कैद आणि मृत्यूची सजा सुनावलीय. 13 लांकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप या आरोपीवर होता.
पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कोर्टानं हा अजब निर्णय दिलाय. ‘मियान चानू’ या व्यक्तीनं आपल्या घरात ठेवलेल्या स्फोटकांमुळे 13 जुलै 2009 रोजी 13 लोकांना प्राणांना मुकावं लागलं होतं. रियाल अली हा पंजाबच्या खानेवाल जिल्ह्यातील मियान चानू इथला रहिवासी. काही कारणामुळे विस्फोटकांचा स्फोट झाला आणि त्यात 13 जण मृत्यूमुखी पडले तर 29 जण गंभीर जखमी झाले होते. शिवाय आजूबाजूच्या 35 घरांचंही यामुळे नुकसान झालं होतं. यावर निर्णय देताना पाकच्या दहशतवाद विरोधी कोर्टानं मियान चालू याला 15 लाखांच्या नुकसानभरपाईसह 112 वर्षांची कैद आणि मृत्यूनची सजा सुनावलीय.
First Published: Thursday, June 21, 2012, 14:37