‘A’ फॉर अल्लाह, ‘B’ फॉर बंदूक, पाकची ABCD - Marathi News 24taas.com

‘A’ फॉर अल्लाह, ‘B’ फॉर बंदूक, पाकची ABCD

पाकिस्तानात ‘दहशतवादी’ ABCD


www.24taas.com, लंडन
पाकिस्तानात उच्चशिक्षित दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणात पैदास कशी होते, याचे ‘पोलखोल’ लंडनमध्ये डेमोक्रसी फोरमने भरवलेल्या परिषदेत पाकिस्तानातील अणुशास्त्राचे अभ्यासक परवेज हुडभॉय यांनी केले आहे. तिथे मुलांना बालवयातच ‘A’ फॉर ‘अल्लाह’, ‘B’ फॉर ‘बंदूक’, ‘J’ फॉर ‘जिहाद’, ‘T’ फॉर ‘टकराओ’ अशी ABCD शिकवली जाते असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानात पाचवीच्या विद्यार्थ्यांची काही विषयांवर सक्तीने चर्चासत्रे घेतली जातात. त्यात हिंदू आणि मुस्लिम भेद, पाकिस्तान निर्मितीची अपरिहार्यता, भारताचे पाकिस्तान विरोधातील दुष्ट षड्यंत्र, शहादत आणि जिहाद यावर ‘लेक्चर्स’ दिली जातात.
 
विद्यार्थ्यांना मद्याप्रमाणेच विज्ञान, खेळ, मनोरंजन यापासून दूर राहण्याची शिकवण देण्यात येते. त्यासाठी वाईन बॉटल, पतंग, हार्मोनियम, गिटार, चेस, कॅरम बोर्ड, टीव्ही, सॅटेलाईट यांची चित्रे दाखवत या गोष्टींचा संग म्हणजे पाप असे धडे दिले जातात. ही माहिती हुडभॉय यांनी प्रबंधाद्वारे या परिषदेत सादर केली. भारतद्वेष आणि दहशतवादाचे अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची सुरुवात जनरल झिया-उल-हक यांच्या राजवटीत झाली, असेही त्यांनी सांगितले.
कराची हे शहर आधी सर्व धर्मीयांचे होते. माझे बालपण तिथेच गेले. मुस्लिमांसहित हिंदू, पारशी, ख्रिश्‍चन हे सारे एकोप्याने राहायचे. आता तिथे फक्त मुस्लिम उरलेत. अख्ख्या पाकिस्तानचे ‘कराची’ होऊ लागले असून अन्य धर्मीय अल्पसंख्याकांना आता तिथे थारा नाही.

First Published: Monday, June 25, 2012, 19:16


comments powered by Disqus