Last Updated: Tuesday, June 26, 2012, 13:31
www.24taas.com, लंडन लंडनमधल्या एका कॉलेजमध्ये पालकसभेसाठी गेलेल्या बुरखाधारी महिलेला कॉलेज परिसरात प्रवेश नाकारला गेलाय.
ब्रिटनस्थित एका कॉलेजमद्ये मारून रफिक ही महिला पालक बैठकीसाठी उपस्थित राहिली होती. मारून आणि अब्दुल रफिक यांचा मुलगा ओवैस हा या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. पण, या महिलेला दरवाज्यातच अडवण्यात आलं. बुरखा हटवून मगच कॉलेजच्या आवारात प्रवेश मिळेल असं या महिलेला सांगितलं गेलं. यावर त्या महिलेनं नकार दिला. त्यामुळे तिला कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.
शेवटी मारून हिनं आपला नवरा अब्दुल रफिक याला बोलावून घेतलं. आणि त्यानंतर अब्दुल या पालकसभेत सहभागी झाला.
.
First Published: Tuesday, June 26, 2012, 13:31