Last Updated: Saturday, December 10, 2011, 11:11
झी २४ तास वेब टीम, मनिला फिलिपाईन्सची राजधानी मनिलापासून काही अंतरावर एक विमान शाळेवर कोसळले. या विमान अपघातात १३ जण ठार झाले. यात दोन मुलांचा समावेश आहे.
मनिला येथून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते सेरॅनो इलेमेंटरी शाळेला धडकले आणि त्याचा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. या अपघातात आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. चात दोन मुलांचा समावेश आहे. आगीत पायलट आणि त्याचे सह पायलट असे सात जण आगीत होरपळून म़त्यू झाला.
सुदैवाने शाळेत त्यावेळी कोणीही नव्हते. त्यामुळे मोठा धका टळला. हे विमान मनिलाहून मिंडोरा बेटांवर निघाले होते, आशी माहिती सुबुरबन पॅरानक्यू शहराचे महापौर फ्लोरेन्सिओ बर्नेब यांनी दिली.
First Published: Saturday, December 10, 2011, 11:11