Last Updated: Wednesday, June 27, 2012, 18:07
www.24taas.com, कराची 
भारताच्या ताब्यात असलेला अबू हमजा कोणता असा सवाल करत पाकिस्तान सरकारनं अबू जिंदालबाबत आज वेगळाच पवित्रा घेतला. मोस्ट वॉण्टेड लिस्टमध्ये दोन अबू हमजा आहेत.
रहमान मलिक यांचं म्हणणं आहे की, काही लोक आमच्या गुप्त ऐजन्सी आयएसआयचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी वक्तव्य केलं की, जर का कोणी आयएसआयचं आणि पाकिस्तानचं नाव खराब केलं तर पाकिस्तान अजिबात सहन करणार नाही त्याचे परिणाम वाईट होतील , असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे.
असं सांगत हा अबू हमजा कोणता? असा सवाल पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी केला आहे. पाक मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानची टोलवाटोलवीची भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. तर दिल्लीतून अटक केलेल्या अबू जिंदालने स्पष्ट केले आहे की, मी कराचीतून त्या १० आतंकवाद्यांना सगळं काही सांगत होते. तेथील कंट्रोल रूममध्ये बसून मी साऱ्या गोष्टी हाताळत होतो.
First Published: Wednesday, June 27, 2012, 18:07