Last Updated: Thursday, June 28, 2012, 15:29
www.24taa.com, ह्युस्टन पाकिस्तानचे माजी मंत्री शेख रशीद यांची चक्क अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. रशीद यांचे लष्कर ए तैय्यबा आणि मुंबई हल्ल्यातील मुख्य सुत्रधार हाफिज सईद याच्याशी संबंध असल्याच्यी पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली. रशीद यांना ह्युस्टन विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.
‘अवामी मुस्लिम लीग ऑफ पाकिस्तान’ या संघटनेचे ते नेते आहेत. त्यांचा लष्कर ए तैय्यबाशी त्यांचा कल दिसून येतो. त्यांनी काल सायंकाळी अमिरातहन प्रयाण केले होते. त्यावेळी ह्युस्टन विमानतळावर पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. रशीद यांना सईद याच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अमेरिकेत राहणाऱ्या समर्थकांना ते मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते, असे सांगण्यात आले. मात्र, पाकिस्तानच्या जियो न्यूज चॅनेलच्या वृत्तानुसार अमेरिकेतील पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाने हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची याबाबत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
First Published: Thursday, June 28, 2012, 15:29