Last Updated: Sunday, December 11, 2011, 03:51
झी २४ तास वेब टीम, हंगरी ऍपलचे को-फाऊन्डर स्टीव्ह जॉब्स यांच्या स्मरणार्थ हंगेरीत त्यांचा ब्रॉन्झ पुतळा उभारला जाणार आहे. हंगेरीयन सॉफ्टवेअर मेकर गाबोर बोजर यांनी हा पुतळा तयार करून घेतलाय. स्टीव्ह जॉब्स यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं.
जॉब्स यांच्या भरीव कामगिरीला श्रद्धांजली म्हणून त्यांचा पुतळा उभारण्याचं बोजर यांनी ठरवलं होतं. त्यानुसार हंगेरीयन शिल्पकार एर्नो टोथ यांनी हा पुतळा साकारायला सुरुवात केली होती. स्टीव्ह त्यांच्या लेक्चर किंवा भाषणादरम्यान जी पोज द्यायचे तीच पोझ या शिल्पात साकारण्यात आलीय.
१८० किलो वजनआणि २२० सेंटिमीटर लांबीच्या या पुतळ्याचं अनावरण येत्या २१ डिसेंबरला करण्यात येईल.ग्राफीसॉफ्ट ही आर्किटेक्चरल डिझाईनसाठीची विख्यात कंपनी आहे.
First Published: Sunday, December 11, 2011, 03:51