अमेरिकेच्या वायुदलाला काळिमा... - Marathi News 24taas.com

अमेरिकेच्या वायुदलाला काळिमा...

www.24taas.com, वॉशिंग्टन 
 
अमेरिकेच्या वायुदलात सहभागी ३१ महिला कॅडेटसना प्रशिक्षकांकडूनच लैगिंक छळाला सामोरं जावं लागलंय. खुद्द वायुसेनेनंच याची कबुली दिलीय.
 
या प्रकरणात टैक्सासच्या सान एन्तोनियो भागातील लॅकलँड एअरफोर्स बेसच्या १२ पुरुष प्रशिक्षकांची चौकशी सध्या सुरू आहे. या १२ प्रशिक्षकांतील ९ प्रशिक्षक हे ३३१व्या प्रशिक्षण स्क्वाड्रनमधून आहेत. वायु सेना शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे कमांडर जनरल एडवर्ड राईस यांनी ही माहिती दिलीय. इतक्या गंभीर आरोपांमुळे या स्क्वॉड्रनच्या कमांडरला डच्चू दिला गेलाय.
 
या ३१ महिलांचा लैगिंक छळ किती दिवसांपासून सुरू होता हे मात्र अद्याप कोडंच आहे. वायुसेनेच्या म्हणण्यानुसार २००९ पासून महिला कॅडेट्सवर असे अत्याचार सुरू होते. यातील ३१ पीडित महिलांनी आपला लैंगिक छळाची कबुली दिलीय. इतर महिलांनाही अशा प्रकाराला सामोरं जावं लागलं असेल तर त्यांचंही म्हणणं आम्ही लक्षात घेऊ, असं राईस यांनी म्हटलंय. वायुसेनेपासून अलिप्त असलेल्या वायुसैनिक अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
.
 

First Published: Friday, June 29, 2012, 13:47


comments powered by Disqus