पाकिस्तानात १०० दहशतवाद्यांना ट्रेनिंग- अबू - Marathi News 24taas.com

पाकिस्तानात १०० दहशतवाद्यांना ट्रेनिंग- अबू

www.24taas.com, नवी दिल्ली
 
2006 साली औरंगाबादमध्ये पकडण्यात आलेला हत्यारांचा साठा हा मुंबई आणि गुजरातवर हल्ला करण्यासाठी लष्कर ए तय्यबाने पाठवला होता असा धक्कादायक खुलासा अबू जिंदालने चौकशी दरम्यान केला आहे. लष्कर ए तय्यबाने ही स्फोटके नेपाळमार्गे भारतात पाठवली होती. हेडलीने देखील हीच माहिती 26/11 तपासादरम्यान मुंबई क्राइम ब्रांचला दिली होती. आता अबू जिंदालनेही हेडलीच्या या माहितीला दुजोरा दिला आहे.
 
औरंगाबादमध्ये स्फोटकांचा साठा पकडल्यानंतर अबू जिंदाल हा कोलकताला पळाला आणि तिथून तो बांगलादेशमार्गे पाकिस्तानला गेला. 2006 मध्ये पोलिसांनी 43 किलो आरडीएक्स, 3200 काडतूसं आणि 16 ए के 47 औरंगाबादमधून पकडली होती. त्याचप्रमाणे नाशिक पोलीस अकादमीवर हल्ला करण्याचाही प्लॅन केला होता.
 
2009 मध्ये लाहोर पोलीस अकादमीवर ज्याप्रमाणे हल्ला झाला होता त्याचपद्धतीची तयारी नाशिक पोलीस अकादमीवर हल्ला करण्यासाठी केली गेली होती. तर पाकिस्तानात आत्तापर्यंत 100 दहशतवाद्यांना ट्रेनींग देण्यात आल्याचा खुलासाही अबू जिंदालने त्याच्या जबानीत केला आहे.

First Published: Tuesday, July 3, 2012, 12:50


comments powered by Disqus