अबू जिंदालचा पॉर्न वेबसाईटवरून संदेश - Marathi News 24taas.com

अबू जिंदालचा पॉर्न वेबसाईटवरून संदेश

www.24taas.com,  मुंबई
 
मुंबई हल्‍ल्‍यातील प्रमुख सूत्रधार अबू जिंदाल हा आपल्या कारवाया करण्यासाठी आणि संदेशाची दे घेवाण करण्यासाठी चक्क पॉर्न वेबसाईटचा वापर करत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे जाळे शोधण्यासाठी पोलिसांना अपयश येत असल्याचे पुढे आले आहे. दहशतवाद्यांनी आपला नेटच्या माध्यमातून गनीमा कावा रचल्याचे अबू जिंदाल याच्या अटकेनंतर चौकशीत उघड झाले आहे.
 
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दहशतवाद्यांकडून वेगवेगळ्या मार्गांचा वापर करण्‍यात येत होता, हे या निमित्ताने स्पष्ट झाले. पॉर्न वेबसाईटचा वापर केला तर कोणाला संशय येणार नाही, याचा अभ्यास अतिरेक्यांनी आणि दहशतवाद्यांनी केल्याचे तपासात उघड होत आहे. पॉर्न वेबसाईटचा वापर करुन अबू जुंदल दहशतवाद्यांना संदेश देत होता, तशी कबुली त्यांनेच दिली आहे.
 
औरंगाबादजवळ वेरुळ येथे  २६ मे २००६ रोजी शस्‍त्रास्‍त्रांचा साठा जप्‍त करण्‍यात आला होता. त्‍यावेळी अबू जिंदाल हा पळून जाण्‍यात यशस्‍वी झाला होता.  तोपर्यंत दहशतवादी कारवायांसाठी पॉर्न वेबसाईटवरुन चॅटच्‍या माध्‍यमातून संपर्क साधायचे.
 
कसा द्यायचे संदेश
सर्वसाधारणपणे तपास यंत्रणांची नजर वेबसाईटवर राहते. त्यामुळे त्यांना गुंगारा देण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा डाव दहशतवाद्यांमध्ये शिजला. ईमेल आणि चॅटींगसाठी पॉर्न वेबसाईट्सचा वापर केला गेला. कारण तपास अधिकाऱ्यांचे वर फारसे लक्ष्‍य जात नाही. त्यामुळे अशा साईटचा वापर करण्याचे ठरले. या वेबसाईट्सच्‍या प्रिमियम सेवांसाठी भरपूर पैसे आकारण्‍यात येतात. तसेच पूर्णपणे गोपनियतेची खात्री देण्‍यात येते. त्‍यामुळे सर्वसामान्‍य जण या सेवांकडे लक्ष्‍य देत नाही. परंतु, मोठ्या प्रमाणात टेरर फंडींग होत असल्‍यामुळे दहशतवाद्यांनी त्‍याचा वापर करुन घेतला.
 
सांकेतिक भाषा
अहमदाबाद रेल्‍वे स्‍थानकावरील बॉम्‍ब स्फोटाची माहीती सांकेतिक भाषेत दिली गेली होती. 'धंधे का उद्घाटन हो गाया है, २५ को दावत कर दी आहे', असा हा संदेश होता. कर्नवती एक्‍स्‍प्रेसमध्‍ये स्‍फोटाचा संदेश औरंगाबाद सायबर कॅफेतून १९ फेब्रुवारी २००६ रोजी पाठविला होता.
 
फेसबुकचा ही वापर
अबू जिंदालची ओळख पटली ती फेसबुकमुळे. त्याचे फेसबुकवर अकाऊंट होते. त्याचा फोटोही त्यावर होता. त्यामुळे संपर्कासाठी फेसबुकाचा वापर करीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

First Published: Wednesday, July 4, 2012, 17:34


comments powered by Disqus