हिंदी महासागरात चीनचा नाविक तळ - Marathi News 24taas.com

हिंदी महासागरात चीनचा नाविक तळ

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
हिंदी महासागरात नाविक तळ उभारण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या आहेत. तशी घोषणाही चीनने केली आहे. हा समुद्रातील तळ भारताची डोकेदुखी ठरणार आहे.
 
हिंदी महासागरातील पॉलिमेटलिक सल्फाईड पुढील 15 वर्षांसाठी मिळावे, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय समुद्रपात्र सुरक्षा संस्थेशीही चीनने करार केला आहे. या करारानुसार हिंदी महासागरातील आग्नेय दिशेच्या 10 हजार किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय  मुद्रपात्रातील उत्खननाचे अधिकार चीनला मिळाले आहे. त्याता पुरेपूर लाभ चीनने उठवला आहे.
 
चीनची आपल्या नौदलाच्या तळांना पुरवठा मार्ग तयार करण्यासाठी व पुनर्बांधणीसाठी हिंदी महासागरातील सियचेलीस बेटावर नाविकी तळ उभारण्याची योजना आहे. त्यासाठी हा नाविक तळ उभारण्यासाठी चीनचे प्रयत्न आहेत. मात्र, हे भारतासाठी नक्कीच  सदायक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

First Published: Tuesday, December 13, 2011, 05:07


comments powered by Disqus