१ मिनिटात उडवू अमेरिकेची दाणादाण - Marathi News 24taas.com

१ मिनिटात उडवू अमेरिकेची दाणादाण

www.24taas.com, तेहरान
 
अमेरिकेने जर इराणवर हल्ला केला तर इराण इस्राइलसह मध्य पूर्वेतील अमेरिकेची ठिकाणं १ मिनिटात उध्वस्त करू अशी इराणने अमेरिकेला धमकीच दिली आहे. तेहरानमध्ये चालू असणारा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम थांबवण्यासाठी चर्चेतून मार्ग न निघाल्यास इस्राइल इराणवर हल्ला करेल.
 
अर्थात, लष्करी हल्ला हा अंतिम पर्याय असेल, असं अमेरिकेचं म्हणणं आहे. तरीही इराणच्या विरोधात आर्थिक प्रचिबंध लागू करण्यासाठी अमेरिका इस्राइलला नेहमीच प्रेरित करत असते.
 
अमेरिकेची ३५ ठिकाणं ही इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल सीमेवर आहेत. जर अमेरिकेने इराणवर युद्ध लादायचा प्रयत्न केला तर अमेरिकेची ही सर्व ठिकाणं १ मिनिटात उडवू अशी धमकी दिली आहे. पाश्चात्य देशांनीच जागतिक ऊर्जेच्या व्यापारामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा आरोप इराणने केला आहे.

First Published: Thursday, July 5, 2012, 08:17


comments powered by Disqus