ब्रिटनमध्ये सहा संशयीत दहशतवाद्यांना अटक - Marathi News 24taas.com

ब्रिटनमध्ये सहा संशयीत दहशतवाद्यांना अटक

www.24taas.com, लंडन
 
लंडन ऑलिम्पिकचा बिगुल वाजायला आता काहीच दिवस शिल्लक असताना ब्रिटीश पोलिसांनी गुरूवारी सहा जणांना संशयित दहशतवादी म्हणून अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.
 
 
या सहा जणांना दहशतवादी कारवायांचा कट रचणे किंवा संशयास्पद कारवाया करणे या लंडनच्या कायद्यानुसार अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
हे सर्व ब्रिटनचे रहिवासी असून त्यांचा ब्रिटनमध्ये घातपात करण्याचा कट असल्याचे समोर आले आहे. या सहा जणांचा ऑलिम्पिकशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
यातील २९ वर्षीय व्यक्तीला वेस्ट लंडनच्या रस्त्यावरून अटक करण्यात आले. तर २१ वर्षीय पुरूषाला आणि ३० वर्षीय महिलेलाही वेस्ट लंडनमधील वेगवेगळ्या घरांमधून अटक करण्यात आले आहे. तर २६, १८ आणि २४ वर्षीय तिघांना इस्ट लंडनमधून अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत २४ वर्षीय व्यक्ती जखमी झाला परंतु, त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published: Thursday, July 5, 2012, 17:04


comments powered by Disqus