जनतेला राजेशाही हवी आहे का? - Marathi News 24taas.com

जनतेला राजेशाही हवी आहे का?

www.24taas.com, काठमांडू
 
अजूनही संविधान लागू न झाल्यामुळे नेपाळचे अपदस्थ महाराज ज्ञानेंद्र शाह यांनी संसदेवर नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थितीत जर जनतेची इच्छा असेल तर देशात पुन्हा राजेशाही पुन्हा येऊ शकते.
 
काठमंडूपासून काही अंतरावरअसलेल्या महाराजगंज येथील आपल्या निर्मल निवास या निवासस्थानी आपल्या ६६वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवशीआपल्या समर्थकांना तसंच जनतेला संबोधित करताना महाराज ज्ञानेंद्र म्हणाले, “जर नेपाळी जनतेने मनावर घेतलं तर नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही येऊ शकते.”
 
महाराजांचं असं म्हणणं असं आहे की संविधान परिषदेच्या अपयशामुळे देशाची परिस्थिती दयनीय झाली आहे. महाराजांच्या वाढदिवसानिमित्त खास सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. महाराजांचे समर्थक, चाहते इत्यादी सुमारे २५०० लोकांचा गोतावळा जमला होता.

First Published: Sunday, July 8, 2012, 09:18


comments powered by Disqus