महाप्रयोग: गॉड पार्टिकलची दिसली झलक - Marathi News 24taas.com

महाप्रयोग: गॉड पार्टिकलची दिसली झलक

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
सृष्टीची रचना कशी झाली त्या रहस्याची लवकरच उकल होण्याची शक्यता आहे. जिनिवातील बिग बँग महाप्रयोगाशी संबंधीत वैज्ञानिकांनी हिग्स बोसोन म्हणजेच गॉड पार्टिकलची झलक पाहिला मिळाल्याचं सांगितलं. ब्रह्मांडाच्या उत्पत्तित हिग्स बोसोन या कणाची भूमिका महत्वपूर्ण मानली जाते. भौतिक शास्त्राच्या नियमानुसार पृथ्वीवरिल प्रत्येक वस्तुला आकारमान देणारा हा कण आहे.
 
लोकांना या बाबतीत १९६० च्या दशकात पहिल्यांदा कळलं होतं. तेंव्हा पासून शास्त्रज्ञ या कोड्याची उकल करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्विर्झलँड आणि फ्रांसच्या सीमेवरती २७ किमी लांबीच्या तळघरात अति सुक्ष्म कणांची टक्कर घडवून हा कण शोधण्याचा शास्त्रज्ञ गेली दोन वर्षे करत आहेत. या प्रयोगात जवळपास आठ हजार वैज्ञानिक सहभागी झाले आहेत. युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (केर्न) च्या ब्रूनो मानसौली या वैज्ञानिकानुसार गेल्या दोन वर्षात हिग्स बोसोन कण सापडेल तिथवर मजल मारण्यात शास्त्रऑज्ञांना यश आलं आहे.
 
भौतिक शास्त्राच्या स्टँडर्ड मॉडेल मध्ये हिग्स बोसोन एक गायब असलेला दुवा आहे. हिग्स बोसोनचा पत्ता लागला तर सृष्टीची निर्मिती कशी झाली या रहस्याची उकल होऊ शकेल. आणि तसं झाल्यास या शतकातलं ती विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कामगिरी असेल. हिग्स बोसोनचा सापडणे हा आईनस्टाइनने शोधलेल्या क्वांटम फिजिक्स एवढाच महत्वपूर्ण शोध असले.  आणि जर गॉड पार्टिकल हे खोटं असल्याचं सिध्द झालं तर वैज्ञानिकांना पार्टिकल फिजिक्सची टेक्स्ट बुक परत नव्याने लिहिणं भाग पडेल.
 
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मांड अस्तित्व आलं तेंव्हा सर्व हवेत तरंगत होतं आणि कोणत्याही वस्तुला वजन किंवा आकार नव्हत तेंव्हा हिग्स बोसोन उर्जा घेऊन आला आणि त्यामुळे सर्व वस्तु एकमेकांशी जोडल्या जाऊ लागल्या आणि त्यातून वजन तसंच आकारमान असलेल्या वस्तु तयार झाल्या. विज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हिग्स बोसोनमुळेच आकाशगंगा, ग्रह, तारे आणि उपग्रहांची निर्मिती झाली.
 
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हिग्स बोसोन हे अतिश अस्थिर पार्टिकल आहे. ज्या प्रमाणे हिग्स बोसोन चा अंत होण्या अगोदर त्याच्या रुपात बदल होतो त्याच प्रमाणे काही अति सूक्षम कण पाहण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा प्रयोग यशस्वी होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

First Published: Wednesday, December 14, 2011, 11:02


comments powered by Disqus