Last Updated: Thursday, July 12, 2012, 10:17
www.24taas.com, इस्लामाबाद 
भारत - पाकिस्तान फाळणीमध्ये महात्मा गांधी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. गांधींजींनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यावर गेले अनेक वर्ष खल सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तान छुप्या पद्धतीने करीत असलेले दहशतवादी हल्ले यासारख्या घटनांनी ही दरी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. मात्र पाकिस्तानमध्ये गांधीवादी असणारे अनेकजण आहेत हे तुम्हांला सांगून खरं वाटणार नाही.
ज्यांना हिंसा नकोय असा एक गट देखील आहे. खुद्द पाकिस्तानचे निवडणूक आयुक्त हे गांधीवादी असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त फखरूद्दीन जी इब्राहीम हे महात्मा गांधींचे शिष्य असल्याचे सांगण्यात आले आहे. अहिंसा व शांततेच्या मार्गाचा अवलंब करणार्या गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवूनच कार्य करण्याचा निर्धार इब्राहीम यांनी केला आहे.
१२ फेब्रुवारी १९२८ रोजी हिंदुस्थानातील गुजरात येथील धरोल गावात इब्राहीम यांचा जन्म झाला. महात्मा गांधीजींच्या सान्निध्यात त्यांनी दिवस काढले असून गांधीजींच्या सत्य, अहिंसा व शांती या बोधवाक्यानुसारच ते आपले आयुष्य जगत आहेत.
First Published: Thursday, July 12, 2012, 10:17